आमच्या हिचं E- हळदीकुंकू ( नवऱ्याचे आत्मकथन)

      संध्याकाळी ऑफिसमधून दमून मी घरी आलो, तोच आमच्या हिनं फर्मानच जारी केलं की 'रविवारी तुम्ही जरा फ्री रहा, आपल्याला हळदीकुंकवाची तयारी करायची आहे '. आता पर्यंत “माझं” असणारे हळदीकुंकू अचानक “आपलं” हळदीकुंकू कसे झाले हे मला समजेना. दरवर्षी घरच्या  हळदीकुंकू समारंभाला "सोसायटी मधले सृष्टीसौंदर्य घर बसल्या बघण्याचा योग” असायचा तेव्हा ही मला घरातून बाहेर हाकलून द्यायची ( माझी इच्छा नसतानाही) आणि आज असे अचानक काय झालं? “कुछ तो गडबड है दया” माझे अंतर्मन मला सांगू लागले.

     यावर्षी आमच्या सोसयटीतील महिला मंडळाने जानेवारीच्या एका रविवारी सार्वजनिक E-हळदीकुंकू साजरा करण्याची अभिनव योजना आखली, म्हणून आमच्या हिनं मला हळदीकुंकू कार्यक्रमात मदतनीस म्हणून सामील करून घेण्याचा घाट घातला होता. महिलांच्या या अभिनव योजनेत माझ्या प्रिय रविवारच्या सुट्टीची आहुती मला द्यावी लागणार या कल्पनेनेच माझ्या डोळ्यासमोर काजव्यांच्या ऐवजीं तिळगुळ चमकायला लागले होते.

      आमच्या हिनं हळदीकुंकू समारंभात पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, उखाणा स्पर्धा आणि पाककला स्पर्धा यात भाग घेतला होता. पाककला स्पर्धेत हिनं Healthy Sesame-Dates Cookies ( अशी अज्ञात रेसिपी) बनवायचं ठरवलं होते.

      रविवारी सकाळीच हिनं मला बाजारातून आणायच्या सामानाची यादी दिली –'इस्त्रीवाल्या कडून ब्लॅक अँड रेड कांचीपुरम साडी, फुलवाल्या कडून मोगरा/ सायलीचा गजरा आणि डेकोरेशनसाठी अस्टरची फुले, cookies बनवायला पॉलिश तीळ.’ मला ही लिस्ट खूप कन्फुसिंग वाटली कारण कांचीपुरम, मोगरा, सायली, अस्टर, पॉलिश तीळ हे सर्व माझ्यासाठी अनाकलनीय होते.मी माझ्या बुद्धीचातुर्यचा वापर करून यादीमध्ये changes केले- “ इस्त्रीवाल्याकडून फ्लॅट नं.५०४ वाल्या मॅडमची साडी, फुलवाल्या कडून हळदीकुंकूची फुले, किरण्याकडून सध्या डिमांड मध्ये असलेले तीळ” असे साहित्य घेवून आलो . माझे दैव बलवत्तर म्हणून मी आणलेलं साहित्य हिच्या पसंतीस उतरले.

      ही तर लिखित कामाची यादी होती. याशिवाय बरीच अलिखित काम करणं हे माझे कर्तव्य होते, जसे- बायकोने बनवलेल्या अज्ञात रेसीपीची पाहिली चाचणी स्वतः वर करून घेणं, बायकोच्या उखाणा स्पर्धेची तयारी करून घेणे, बायकोच्या साडीचे आणि लूक्सचे सतत कौतुक करणे, E- हळदीकुंकू साठी झूम मीटिंग सेटअप रेडी ठेवणे, वेगवेगळ्या अंगेल्सने जो पर्यंत बायकोचे मन भरत नाही तो पर्यंत तिचे फोटोज् काढणे.

      Cookies बनवून झाल्यावर त्या घेवून मी पाककला स्पर्धेच्या परिक्षिका- समोरच्या बिल्डिंग मधल्या जोशी काकूंकडे गेलो. माझ्या सारखे ४-५ आज्ञाधारक नवरे तिकडे डब्बा घेवून आले होते. डायनिंग टेबलवर आम्ही सर्व पदार्थ मांडून ठेवले. जोशी काका खूपच प्रेमळ, आम्हाला म्हणाले की” रिकामा डब्बा घरी घेवून जावू नये, त्या डिस्प्लेला ठेवलेल्या items मधील तुमच्या आवडीचे २-४ घेवून जा” त्यांच्या विनंतीचा मान राखून मी २ गुळपोळी, ५ तिळाचे लाडू आणि ५ तिळाच्या चिक्की घेवून आलो, नाही तरी आमच्या दुपारच्या जेवणाला उशीर झालाच होता.

      आमच्या हिनं मराठी सीरिअल्सची नाव वापरून एक unique आणि भन्नाट उखाणा बनवला होता –

             'लाडाची मी लेक गं' सानेंची,

            झाले 'श्रीमंताघरची सून' बनेंची !

                          'रंग माझा वेगळा' तारुण्याचा,

                          'जीव झाला येडापिसा' यांचा!

            'तुझ्यात जीव रंगला' ही कबूली,

           ' चंद्र आहे साक्षीला' म्हणतं दिली!

                            'फुलाला सुगंध मातीचा' कोवळा,

                          ' सहकुटंब सहपरिवार' पार पडला सोहळा!

           ' माझा होशील ना' वादा सात जन्माचा,

           'राजाराणीची जोडी' सावरेल गाडा संसाराचा!

                          ' कारभारी लयभारी' आहेत खूपच ग्रेट,

                         आणि मी त्यांची 'होम मिनिस्टर' फेवरेट!

          ' सुखं म्हणजे नक्की काय असतं?'

            यांचं नाव सदैव माझ्या मनी वसतं!

       मराठी सीरिअल्स हा तमाम महिलामंडळाचा जिव्हाळ्याचा विषय , त्यामुळे आमच्या हिनं स्वतः रचलेला हा उखाणा अवॉर्ड विनिंग ठरणारं हे निश्चित होते. आमची पूर्ण दुपार ही उखाणा पाठांतरामध्ये वाया गेली.

      संध्याकाळी आमची ही ब्लॅक अँड रेड चेक्स डिझाईनची साडी आणि त्याला मॅचींग मास्क लावून आम्हाला दाखवायला आली. आमचे चिरंजीव जोरात ओरडले, “ मॉम या ब्लँक अँड रेड वेब डिझयनिंग साडी आणि मास्क मध्ये ना तू एकदम Spiderman सारखी दिसते आहे” आम्ही दोघंही पोट धरून हसायला लागलो. मी तर इमॅजिन पण केले की आमची ही या बिल्डिंग वरून त्या बिल्डिंग वर उड्या मारत मैत्रिणींना भेटायला जाते आहे आणि उलट लटकून बायकांना तिळगुळ वाटते आहे. आमच्या हिनं डोळे वटारून आमच्या दोघाकडे बघितले, पण मेकअप खराब होवु नये म्हणुन तिने जास्त रिअँक्शन आम्हाला दिल्या नाहीत. मात्र वेगवेगळ्या angels ने आणि स्पेशल इफेक्ट्स देवून ५० फोटोज् काढायची शिक्षा आम्हाला ठोठावण्यात आली.

      E- हळदीकुंकू २ तास चाललं. आमच्या हिचा उखाणा स्पर्धेत आणि पाककला स्पर्धेत नंबर आला , म्हणून ती खुश होती. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो असे म्हणतात, पण आमच्या हिनं यशाचं थोडही क्रेडिट मला दिले नाही.मी जेवढ्या उत्साहाने हिला E-  हळदीकुंकू समारंभाला मदत केली, तेवढ्या उत्साहाने हिनं माझ्या मित्रासोबतच्या E- पार्टीत मला कधीचं मदत केली नसते हे ठावूक आहे मला. शेवटी काय आम्हा पुरूषाचे मन खूप मोठे असते हेचं खरे.

@ श्रद्धा नाईक

Smrutigandha Blog's Link

Smrutigandha Facebook Page 





Comments

  1. एकदम उत्तम लेख....मला पण आता saseme dated cookies ची रेसिपी हवी 😄

    ReplyDelete
  2. Chan...sarv ukhane Bhari ahet👌

    ReplyDelete
  3. श्रद्धा खुपच छान.

    ReplyDelete
  4. 🙏👍👍श्रद्धा खुपच छान लिहिलंय नवऱ्याच्या नजरेतून हळदीकुंकू. ऊतम बारकावे आणि निरीक्षण. उखाणे अप्रतिम. असेच नवनवीन लेखन घडत राहो.प्रत्येक वेळी प्रतिभा उच्च दर्जेदार होतेय.अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 💐👍✒️📖

    ReplyDelete
  5. 🙏👍👍श्रद्धा खुपच छान लिहिलंय नवऱ्याच्या नजरेतून हळदीकुंकू. ऊतम बारकावे आणि निरीक्षण. उखाणे अप्रतिम. असेच नवनवीन लेखन घडत राहो.प्रत्येक वेळी प्रतिभा उच्च दर्जेदार होतेय.अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 💐👍✒️📖

    ReplyDelete
  6. Pradnya shirodkar12 February 2021 at 17:56

    Kai mast lihilays g.. Mast khuskhushit aani narm vinodi.. Really like your writing style. Keep ✍️

    ReplyDelete
  7. Nice yaar..pan Bachara Navara :-p

    ReplyDelete
  8. Khup chan Shraddha......
    Barech navare khush zale astil tyanchi baju koni tari mandali ahe mhnun

    ReplyDelete
  9. Harshada Rane Ratnakar13 February 2021 at 08:44

    अप्रतिम लेख.....खुप मजा आली वाचताना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अजिंक्यतारा