Posts

Image
  आधुनिक हिरकणी शिव कालीन हिरकणी  झाली इतिहासात अमर, तिचे ऐकुन दिव्यत्व फुटे हृदयास पाझर! काळ गेला बदलले जरी हिरकणीचे रूप, मनी वात्सल्यही तेच परी बुरुजही खूप! आधुनिक हिरकणीची लागे प्रतिदिन कसोटी, घर – ऑफिस तोलण्याची तिची कसरत मोठी! पहाटे पासून होते तिच्या लढाईची सुरवात, आधी प्रेमाने, लाडाने मग ओरडत, दटावत! ऑफिस,शाळा गाठण्याची सुरू एकत्र तयारी, माय लेकराची घरातून धडपडत निघते स्वारी! धावत पळत जावून पिल्लास शाळेत सोडते, “आज वेळेवर येईन” वेडे वचनही देते! ओढणी, बॅग सरसावत लोकलमध्ये झोकुन घेते, चिरडत, भांडत, लटकत कशीबशी ऑफिस गाठते! मीटिंग, प्रेझेंटेशन, टार्गेट वाढवते कामाचं प्रेशर, या सर्वामध्ये पडतो तिला घरचा विसर! नवनवीन आव्हाहने अन् जीवघेण्या त्या स्पर्धा, या सर्वामध्ये नकळत दिवस मावळतो अर्धा! लंचब्रेक मध्ये फोनवर होते विचारपूस धावती, पिल्लू शाळेतून आल्याची मनास मिळते पावती! घड्याळाच्या काट्यावर तिची भिरभिरते नजर, इतक्यात नवीन काम समोर दत्त म्हणून हजर! भराभर काम उरकण्याचा तिचा नेहमीचा हेका, पुढे जाणारा सेकंद वाढवी काळजाचा ठोका! घरच्या कॉल्सला कंटाळून मोबाईल धारातीर्थी पडतो, सर्व आवरू
Image
  आमच्या हिचं E- हळदीकुंकू ( नवऱ्याचे आत्मकथन)       संध्याकाळी ऑफिसमधून दमून मी घरी आलो, तोच आमच्या हिनं फर्मानच जारी केलं की 'रविवारी तुम्ही जरा फ्री रहा, आपल्याला हळदीकुंकवाची तयारी करायची आहे '. आता पर्यंत “माझं” असणारे हळदीकुंकू अचानक “आपलं” हळदीकुंकू कसे झाले हे मला समजेना. दरवर्षी घरच्या  हळदीकुंकू समारंभाला "सोसायटी मधले सृष्टीसौंदर्य घर बसल्या बघण्याचा योग” असायचा तेव्हा ही मला घरातून बाहेर हाकलून द्यायची ( माझी इच्छा नसतानाही) आणि आज असे अचानक काय झालं? “कुछ तो गडबड है दया” माझे अंतर्मन मला सांगू लागले.      यावर्षी आमच्या सोसयटीतील महिला मंडळाने जानेवारीच्या एका रविवारी सार्वजनिक E-हळदीकुंकू साजरा करण्याची अभिनव योजना आखली, म्हणून आमच्या हिनं मला हळदीकुंकू कार्यक्रमात मदतनीस म्हणून सामील करून घेण्याचा घाट घातला होता. महिलांच्या या अभिनव योजनेत माझ्या प्रिय रविवारच्या सुट्टीची आहुती मला द्यावी लागणार या कल्पनेनेच माझ्या डोळ्यासमोर काजव्यांच्या ऐवजीं तिळगुळ चमकायला लागले होते.       आमच्या हिनं हळदीकुंकू समारंभात पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, उखाणा स्पर्धा आणि पाककल

अजिंक्यतारा

Image
 अजिंक्यतारा        २७ डिसेंबर २०२० दुपारची वेळ होती. आमच्या घरी शेजारचे आणि घरातले क्रिकेटप्रेमी social distancing ठेवून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या कसोटीचा आस्वाद घेत होते. अचानक एकच चित्कार झाला आणि सर्व श्रोत्रावृंद “ century झाली, century झाली” ओरडत गणपती स्पेशल डान्स करू लागले, औचित्य होते अजिंक्य रहाणे याच्या शतकाचे. मराठ्यांचा  “ अजिंक्यतारा” पुन्हा एकदा झळाळून उठला.        एक अजिंक्यतारा म्हणजे अभेद्य असा छत्रपती शिवरायांचा गिरीदुर्ग आणि दुसरा अजिंक्यतारा म्हणजे क्रिकेटच्या आसमंतातील एक अढळ तारा.        पहिला अजिंक्यतारा हा सातारा जिल्हातील ४४०० उंचीचा बाणमोली पर्वतरांगावर वसलेला दुर्ग. मराठयांची  'चौथा गड'/ चौथी राजधानी म्हणून अजिंक्यतारा प्रसिद्ध होता. पहिला राजगड, दुसरा रायगड, तिसरा जिंजी आणि चौथा अजिंक्यतारा. शिवरायांच्या चरणस्पर्शने पावन झालेला, परकीय आक्रमण निधड्या छातीने झेलणारा, छत्रपती शिवाजीमहाराजा पासून ते छत्रपती शाहु महाराजा पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार.       दुसरा अजिंक्यतारा म्हणजे अजिंक्य रहाणे, हा भारतीय क्र
Image
  भांडा सौख्यभरे     माझे लहानपण बैठया चाळीमध्ये गेले. आमची खोली सर्वात शेवटची. आणि त्याच्या बाजूला सार्वजनिक नळ . नळा वर  पाणी भरायला येणाऱ्या बायकांची भांडणे आवडीने बघणे हा माझा तेव्हाचा  आवडता छंद झाला होता. आमच्या घराच्या खिडकीत बसले की काय मस्त लाईव्ह भांडणे दिसायची म्हणून सांगू. तेव्हाच्या काळी almost सर्व variety ची भांडण चाळीत लाईव्ह telecast व्हायची. आज काल सारखे बिग बॉस मधली ठरवून केलेली भांडणं बघायची तेव्हा गरज नव्हती.     चाळीमध्ये भांडणाचे प्रमुख्याने दोन प्रकार पडतात – पहिला प्रकार म्हणजे घरातल्या घरात करायची भांडणे आणि दुसरा प्रकार म्हणजे सर्व घरातल्यांनी एकजूट होवून शेजारच्याशी करायची भांडणे. पहिल्या प्रकारात भांडणाऱ्याचे संख्याबळ कमी असल्या कारणाने आवाजाची intensity कोण कोणाशी भांडत आहे या वर अवलंबून असायाची. नवरा - बायको, आई - लहान मुले यात होणारी भांडणे ही हळू आवाजामध्ये पार पडत. या उलट सासू - सूना, दोन जावा यामधील भांडणे थोड्या high intensity ने आणि घरातल्या वस्तुच्या आदळा आपटी च्या background music वर , तर कधी कधी शक्तिप्रदर्शन करून सम्पंन होत असतं . पण