भांडा सौख्यभरे

    माझे लहानपण बैठया चाळीमध्ये गेले. आमची खोली सर्वात शेवटची. आणि त्याच्या बाजूला सार्वजनिक नळ. नळावर पाणी भरायला येणाऱ्या बायकांची भांडणे आवडीने बघणे हा माझा तेव्हाचा  आवडता छंद झाला होता. आमच्या घराच्या खिडकीत बसले की काय मस्त लाईव्ह भांडणे दिसायची म्हणून सांगू. तेव्हाच्या काळी almost सर्व variety ची भांडण चाळीत लाईव्ह telecast व्हायची. आज काल सारखे बिग बॉस मधली ठरवून केलेली भांडणं बघायची तेव्हा गरज नव्हती.

    चाळीमध्ये भांडणाचे प्रमुख्याने दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे घरातल्या घरात करायची भांडणे आणि दुसरा प्रकार म्हणजे सर्व घरातल्यांनी एकजूट होवून शेजारच्याशी करायची भांडणे. पहिल्या प्रकारात भांडणाऱ्याचे संख्याबळ कमी असल्या कारणाने आवाजाची intensity कोण कोणाशी भांडत आहे या वर अवलंबून असायाची. नवरा- बायको, आई- लहान मुले यात होणारी भांडणे ही हळू आवाजामध्ये पार पडत. या उलट सासू- सूना, दोन जावा यामधील भांडणे थोड्या high intensity ने आणि घरातल्या वस्तुच्या आदळा आपटी च्या background music वर , तर कधी कधी शक्तिप्रदर्शन करून सम्पंन होत असतं . पण घरातल्या घरात होणाऱ्या भांडणंमुळे आमच्या सारखे भांडणाचे दर्दी लोक फक्त श्रवण सुख घेवू शकत होतो , कारण त्या काळी सीसीटीव्हीचा शोध लागला नव्हता.

    खरी मेजवानी असते शेजारच्याशी केलेल्या भांडणात. जरा कुठे भांडणाचा आवाज आला की आम्ही मुलं हातामधली सर्व काम टाकून भांडणं चालू असणाऱ्या ठिकाणी गोळा होत असू. सर्व लोकांना धक्के मारून भांडणं बघायला पुढे उभे राहणे ही देखील एक कलाच म्हणायला हवी. या प्रकारची भांडणे धोकादायक असू शकतात म्हणून ही भांडण शक्यतो  boundary line बाहेर उभे राहून बघणे सोयीस्कर असते. दोन्ही टीममध्ये किती एक्स्पर्ट प्लेअर्स आहेत त्या वर भांडणंचां निकाल अवलंबून असतो. शुल्लक कारण वरून सुरू झालेलं भांडणं कधी रौद्र रूप घेत ते कळतच नाही. म्हणजे मुलाच्या साध्या खोडयामुळे सुरू झालेला भांडणं, मग opposite team members वर काटेरी शाब्दिक बाणाचां वर्षाव घडवून जो पर्यंत समोरचा धारातीर्थी पडत नाही तो पर्यंत चालू राहतात. हा high energetic , time consuming महा एपिसोड पार पाडून गेल्या वर maximum ५-७ दिवस याची आठवण प्रेक्षक आणि विरोधी पक्षांना राहते.

   माझ्या आठणीतली भांडण म्हणजे नळावर ब्राह्म मुहुर्त साधून होणारी भांडणे. या भांडणाचे अनेक फायदे आहेत. तुम्ही गजर ना लावता लवकर उठता, भांडण बघत दात घासून होतात आणि भांडणाऱ्याचे लक्ष नसेल तर तुम्ही successfully एक बादली पाणीपण भरू शकता.

   मी ५ वर्षाची असताना अशीच एकदा नळा वरचे भांडणं आमच्या घराच्या खिडकीत बसून मन लावून बघत होते. भांडणाचा  अर्थ एवढं लक्षात येत नव्हता,  मात्र जोर जोरात कळशी आपटणाऱ्या बायका बघून मला मज्जा येत होती. अचानक त्यातल्या एका बाईचे माझ्याकडे लक्ष गेले. आमची खिडकी नळापासून फक्त १० फूट अंतरावर होती. एवढी छोटी मुलगी आपले भांडण बघते आहे याचे कदाचित त्यांना अप्रूप वाटले असावे. त्या दोघी भांडण थांबवून माझ्याकडे बघून हसल्या आणि कळशी मधले पाणी माझ्या दिशेने उडवले. मी भांडण अचानक थांबले या अनपेक्षित धक्क्याने आणि माझ्यावर झालेल्या पाण्याच्या हल्ल्याने खिडकीवरून खाली पडले आणि माझे पुढचे दोन दात पडले.

   दोघाचे भांडण तिसऱ्या चा लाभ   ही म्हण माझ्या बाबतीत  खोटी  ठरली.एक  नवीन म्हण त्या क्षणी उदयाला आली  “दोघाचे भांडण आणि तिसऱ्याचां दात”.

   त्याच्या भांडणंला मी दिलेली  उत्सुफुर्त दात ( दाद) त्या दोघीना आवडली असावी. कारण त्यानंतर त्या दोघी जेव्हा जेव्हा पाणी भरायला यायच्या तेव्हा मला हाक मारल्या शिवाय जायच्या नाही. आणि आता माझ्याकडे भांडण बघताना दोन खिडक्या होत्या एक आमच्या घराची आणि दुसरी माझ्या दाताची.

   अशी ही चाळी मधली क्षणभंगुर भांडण तुम्ही देखील नक्की अनुभवली असतील ना. जुन्या आठवणीच्या खजिन्या मधली ही पहिली भेट तुमच्या साठी. अश्याच गमतीशर आठवणी घेवून मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तो पर्यंत भांडा सौख्यभरे!!!!!!!

 

लेखिका-

सौ. श्रद्धा नाईक



Comments

  1. A very well written blog. A good start, all the best

    ReplyDelete
  2. Nice story.. Keep them coming 👍🏻👍🏻

    ReplyDelete
  3. Very nice start.All d best.Houn jau de Smrutigandha Saukhyabhare❤️

    ReplyDelete
  4. छान लिहिलंय... चित्र समोर उभं राहिलं...

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिल आहेस 👌

    ReplyDelete
  6. Great Shraddha .....
    Very beautiful narration
    Keep it up and all the very best💐💐💐

    ReplyDelete
  7. Very well written Shraddha...! Tujhe june ghar dolyasamor ubhe rahile! Great start! Happy blogging!

    ReplyDelete
  8. Congratulations, finally you started writing. Very happy for you. Keep shining. Ani khup sundar and jivhalyacha vishay ;)

    ReplyDelete
  9. Fantastic blog Shradhha.. nicely placed words.. enjoyed it

    ReplyDelete
  10. खूप.छान लेखन

    ReplyDelete
  11. उत्कृष्ट लेखन, वास्तव परिस्थिती, यशस्वी भव: खूप खूप शुभेच्छा श्रद्धा ��������

    ReplyDelete
  12. सून्दर लेखण,उत्तम निरीक्षण....असेच चालू ठेवा,शुभेच्छा.

    ReplyDelete
  13. Congrats for a new start. Keep writing.

    ReplyDelete
  14. खूप छान शब्द चित्र रेखाटले आहे

    ReplyDelete
  15. खूपच सुंदर लेख आहे.. त्यामुळे खरंच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..All the Best.. Waiting for your next Post..��

    ReplyDelete
  16. खुप छान ब्लॉग लेखन आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुढिल ब्लॉग लेखनासाठी शुभेच्छा,👍
    🙏सुदर्शन सदानंद नाईक, खारघर, नवी मुंबई.

    ReplyDelete
  17. Khup Chaan Shraddha
    Keep it up 👌👌👌❤️❤️👍👍

    ReplyDelete
  18. खूप छान सुरुवात आहे श्रध्दा !
    मांडणी छान ,त्याला विनोदाची झालर अप्रतिम.असेच लिहित रहा .🌟👌

    ReplyDelete
  19. Khup chan aahe
    Keep it up
    Congratulations...
    From - yogesh & mrunal patil-dukhande

    ReplyDelete
  20. Pradnya Dhairyawan11 January 2021 at 07:48

    Very well penned! Absolutely nostalgic.. keep blogging. Good luck!

    ReplyDelete
  21. श्रद्धा खुपच छान लिहिले. चाळ समोर उभी राहीली. अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  22. Wah khup chhan junya athavani tajya zalya....

    ReplyDelete
  23. खूप छान लिहिले आहेस

    ReplyDelete
  24. हुबेहूब वर्णन आणि अचुक निरिक्षण आणि लेखणी 👍👍

    ReplyDelete
  25. अप्रतिम ताई

    ReplyDelete
  26. Khup mast lihila aahes shraddha... Ajun wachayla aavdel 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अजिंक्यतारा