Posts

Showing posts from February, 2021
Image
  आमच्या हिचं E- हळदीकुंकू ( नवऱ्याचे आत्मकथन)       संध्याकाळी ऑफिसमधून दमून मी घरी आलो, तोच आमच्या हिनं फर्मानच जारी केलं की 'रविवारी तुम्ही जरा फ्री रहा, आपल्याला हळदीकुंकवाची तयारी करायची आहे '. आता पर्यंत “माझं” असणारे हळदीकुंकू अचानक “आपलं” हळदीकुंकू कसे झाले हे मला समजेना. दरवर्षी घरच्या  हळदीकुंकू समारंभाला "सोसायटी मधले सृष्टीसौंदर्य घर बसल्या बघण्याचा योग” असायचा तेव्हा ही मला घरातून बाहेर हाकलून द्यायची ( माझी इच्छा नसतानाही) आणि आज असे अचानक काय झालं? “कुछ तो गडबड है दया” माझे अंतर्मन मला सांगू लागले.      यावर्षी आमच्या सोसयटीतील महिला मंडळाने जानेवारीच्या एका रविवारी सार्वजनिक E-हळदीकुंकू साजरा करण्याची अभिनव योजना आखली, म्हणून आमच्या हिनं मला हळदीकुंकू कार्यक्रमात मदतनीस म्हणून सामील करून घेण्याचा घाट घातला होता. महिलांच्या या अभिनव योजनेत माझ्या प्रिय रविवारच्या सुट्टीची आहुती मला द्यावी लागणार या कल्पनेनेच माझ्या डोळ्यासमोर काजव्यांच्या ऐवजीं तिळगुळ चमकायला लागले होते.       आमच्या हिनं हळदीकुंकू समारंभात पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, उखाणा स्पर्धा आणि पाककल